मुंबई : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने (ED) अटक केली. या अटकेमुळे राज्य सरकार (Maharashtra Government) आणि केंद्र सरकार (Central Governmet) यांच्यात वाद पुन्हा पेटला आहे. अटकेमुळे केंद्रातील भाजप सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून दिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांकडून या अटकेचं मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे. भाजपच्या मोहित कम्बोज (Mohit Kamboj) यांनी हवेत तलवारबाजी करत जल्लोष साजरा केला.  (bjp leader mohit kamboj celebrated the arrest of nawab malik with a sword)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सार्वजनिक ठिकाणी तलवारबाजी करणं हा गुन्हा आहे. आतापर्यंत वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याने अनेकांना अटक करण्यात आली आहे. आता मोहित कम्बोज यांनी तलवारबाजी करत मलिकांच्या अटकेचा जल्लोष साजरा केला. त्यामुळे आता मोहित कम्बोज यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.