भाजप नेते मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल
Mohit Kambhoj Against FIR : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : Mohit Kambhoj Against FIR : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 2011 ते 2015 साली 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती, त्यासाठी वापरली गेली नसल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने त्यांच्यावर आता काय कारवाई होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यांच्या कंपनीने तब्बल 52 कोटी रुपयांचे कर्ज बुजवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून हे कर्ज घेतले होते. पण हे पैसे ज्या कारणासाठी हे कर्जाचे पैसे घेतले होते, त्याऐवजी अन्यत्र वळवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढे कोणती कारवाई होणार, याची उत्सुका आहे.