मुंबई: आगामी काळात शिवसैनिकाला देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे मनसुबे जाहीर करणाऱ्या सेनेला भाजप आमदार नितेश राणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे. पंतप्रधानपद लांबच राहिले. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर स्वत:चा महापौर तरी बसवून दाखवावा, असे आव्हानच नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून नितेश राणे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे १८०-२०० आमदार निवडून येतील'



आज मुंबईत शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी आगामी काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवण्याचा मनसुबा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. तर खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनीही राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा विस्तार करण्याचे संकेत दिले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून प्रोजेक्ट केले जाईल, असा अंदाज आहे. 


उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत


...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे १८०-२०० आमदार निवडून येतील
शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असे वक्तव्य खासदार अनिल देसाई यांनी केले. आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.  शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. देशाच्या पंतप्रधानपदी शिवसैनिक बसेल, असे काम करुयात. जर शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर महाराष्ट्रात नक्कीच शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला