मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांना अजूनही वाटतं मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात, पण जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता, पण तुमच्या नशिबात नव्हतं आणि म्हणून तुम्ही वचन मोडलंत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय चांगले काम केले हे सांगणे गरजेचे होतं, पण मुंबई शिवाय राज्यात इतर काही केल्याच सांगितले नाही. त्यांच्या भाषणात फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आकस दिसला अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 


सत्तेसाठी विचार त्यांनी बाजूला ठेवला आणि भाजपाला सत्तापिपासू म्हणणं योग्य नाही. बाळासाहेब यांचे हिंदुत्व आणि उद्धव यांचे हिंदुत्व फरक स्पष्ट जाणवले, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपाला उपरे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी उदय सामंत, गडाख, प्रियांका चतुर्वेदी उपरे आहे का नाही हे सागंवं असा टोला लगावला. 


देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले होते, युतीला जनमत होतं, विचारधारा सोडत सरकार स्थापन करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे, जनतेच्या मनांत फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे.