युतीच्या चर्चेसाठी भाजपची जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. युतीची चर्चा करायला भाजपचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मातोश्रीवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपनं शिवसेनेसमोर लोकसभेसाठी जागावाटपाचं २५-२३ असं तर विधानसभेसाठी १४५-१४३ असं सूत्र ठेवल्याची माहिती आहे. मात्र शिवसेनेनं हे सूत्र अमान्य असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा तिढा सूटण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवतील की फक्त लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील याबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना १९९५ साली झालेल्या सूत्राप्रमाणे जागावाटप करण्यावर अडून बसली होती अशी देखील चर्चा होती. शिवसेनेसाठी भाजपने आपल्या ताब्यातील काही मतदारसंघ सोडण्याची तयारीही दाखवल्याचे समजते आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षांनी अनेकदा स्वबळाचे नारेही दिले. मात्र, एकूणच राजकीय परिस्थिती पाहत दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु होणार आहे. 


युतीसाठी भाजपसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेने अनेकदा नकार दिला आहे.