तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं राष्ट्रवादीसोबत (Ncp) जाणं भाजपसाठी (BJP) एखाद्या जखमेपेक्षा कमी नाही. उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीची साथ देण्यावरुन भाजपनं पुन्हा एकदा सडकून टीका केलीय. काय टीका केलीय भाजपनं. (bjp maharashtra president chandrashekhar bawankule critisize to ncp over to uddhav thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपची साथ सोडली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपला विरोधात बसावं लागलं. भाजपला हे शल्य आजही आहे. त्यामुळेच भाजप उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादीसोबतच्या घरोब्यावर टीका करण्याची एक संधी सोडत नाही. आता ठाकरे-पवार, ठाकरे-राष्ट्रवादी संबंधांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपहासात्मक टीका केलीय. जादुटोणा करत राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं असं बावनकुळे म्हणालेत. बावनकुळेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीनंही जोरदार पलटवार केलाय.


मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलं आणि भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. भाजपला जवळजवळ अडीचवर्ष विरोधात बसावं लागलं. भाजपसाठी हे एखाद्या जखमेपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळेच संधी मिळते तेव्हा भाजप राष्ट्रवादीवरुन ठाकरेंवर टीका करतं. आता अशीच टीका बावनकुळेंनीही केली. पण ही टीका थेट पवारांवर असल्याचंच बोललं जातंय. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.