मुंबई : मुंबई महापालिकेनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीलाच शहरात नवं कंत्राट दिल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे. ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीलाच 16 नवे ऑक्सिजन लावण्याचं कंत्राट दिल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. हे कंत्राट 84 कोटी रुपयांचे असून ' हायवे कंस्ट्रक्शन कंपनी'ला देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित साटम यांनी पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलेल्या पत्रात कंत्राट देण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काम पूर्ण झालेली नसतानाच या कंत्राटदाराला आणखी सव्वा तीनशे कोटींचं  कंत्राटही 'हायवे कंस्ट्रक्शन कंपनी' देण्यात आल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.



मुंबई पालिकेनं हे कंत्रात मे महिन्याच्या अखेरीला दिले आहे. कंत्राटदारानं शहरात एकूण 12 ठिकाणी 16 ऑक्सिजन प्लांट लावण्याचे काम 30 दिवसात अपेक्षित होते. पण अद्याप अनेक ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही असा अमित साटम यांचा दावा आहे. कंत्राट 16 जूनला देण्यात आलं. पण प्रत्यक्ष प्लांट लावण्यासाठीचे प्लॉट मात्र 25 जूनला देण्यात आली. त्यामुळे कामं पूर्ण करण्याची मुदत 25 जुलै असल्याचं बीएमसीचं म्हणणं आहे.