मुंबई :  अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत मनापासून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट... हा प्रत्येक व्यक्तीचा आवडता खेळ. कुणाला हा खेळ खेळायला आवडतो तर कुणाला नुसता पाहायला... एकदा तरी बॅट हातात घेतली नाही असा एकही जण सहसा सापडायचा नाही. सध्या क्रिकेट.. मैदान.. बॅट हा शब्द सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे. क्रिकेट म्हटलं की धावपट्टी आली आणि धावपट्टी म्हटलं की धावांसाठी केलेली धावपळ आली... पण एका व्हिडिओ चक्क सिक्सर लगावताना प्लेअर धावपट्टीवरच कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ आहे मुंबै बँकेची धुरा आपल्या खांद्यावर पेलणारे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 


थंडीला थोडी सुरूवात झाली की, सगळीकडेच क्रिकेटचे सामने भरवले जातात. आजकाल या सामन्यांच्या उद्घाटनासाठी नेतेमंडळींना आयोजित केले जाते. 


मग काय नेते मंडळी देखील आपल्या बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा या मैदानावर पूर्ण करतात. आणि आपण विराट, धोनी अगदी सचिन तेंडुलकर असल्याच्या आविर्भावात खेळायला जातात खरे...पण... 


पण नेमकं काय होतं ते तुम्ही या पुढील व्हिडिओतच पाहा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बोरिवलीतील आहे एवढीच माहिती अद्याप मिळालेली आहे. 


उद्घाटन केल्यानंतर प्रवीण दरेकरांनी सामन्याला सुरूवात करण्यापूर्वी बॅट हातात घेतली. आयोजक आणि तेथे उपस्थित असलेले क्रिकेटप्रेमी अतिशय खूश झाले. आमदारांच्या हस्ते सामन्याला सुरूवात होत असल्याचे पाहताच अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली. पण हा वेगळाच व्हिडिओ रेकॉर्ड झाला..