राज कुंद्राकडून 3 हजार कोटींचा ऑनलाईन गेमिंग घोटाळा, भाजप आमदार राम कदम यांचा आरोप
पैसे परत मागण्यासाठी जाणाऱ्या लोकांना मारहाण करण्यात आल्याचा दावाही राम कदम यांनी केला आहे
मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणी अडचणीत सापडलेल्या राज कुंद्राचा पाय आणखी खोलात जाणयाची शक्यता आहे. भाजप आमदार राम कदम यांनी राज कुंद्रावर ऑनलाईन गेमिंग घोटाळ्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा 3 हजार कोटींचा असल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे. राज कुंद्रा याने लोकांची फसवणूक करत ऑनलाईन गेमिंगच्या नावावर त्यांच्याकडून 15 ते 30 लाख रूपये घेतले, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
लोक जेव्हा पैसे मागण्यासाठी राज कुंद्राच्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. इतकच नाही तर पीडितांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली. हा ऑनलाईन गेमिंग घोटाळा वियान इंडस्ट्रीजच्या माध्यमातून करण्यात आला, असा गंभीर आरोप राम कदम यांनी केला आहे.
वियान कंपनीनं अनेकांसोबत करार केले. कंपनी या कराराची मूळ कागदपत्रं स्वत:कडे ठेवायची. या माध्यमातून कंपनीनं अनेकांची फसवणूक केली,' असं राम कदम म्हणाले.