मुंबई : घाटकोपर पश्चिमचे भाजपचे आमदार राम कदम यांना जोरदार दणका बसलाय. दहिहंडी उत्सवात केलेल्या वादग्रस्त विधानानंतरआमदार राम कदम यांचे पक्ष प्रवक्ते पद स्थगित करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही वाहिनीवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी जाऊ नका, अशा सूचना पक्षाने दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार कदम यांच्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाची बदनामी होत असल्यामुळे हे पाऊल उचलले गेल्याची चर्चा आहे. सध्या त्यांना केवळ तोंडी सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच पक्षाच्या अध्यात्म विभागाचे प्रमुखपदही कदमांकडून काढून घेतले जाण्याचे संकेत मिळत आहेत.