मुंबई: भाजपची सोमवारी मुंबईत आणखी एक मेगाभरती होणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडाळकर आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी काँग्रेसचे सहा नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले मालाडमधील आमदार अस्लम शेख यांचा समावेश आहे. याशिवाय, राहुल बोंद्रे (बुलढाणा), काशीराम पावरा (धुळे), डी.एस. अहिरे (धुळे), सिद्धराम म्हेत्रे (सोलापूर) आणि भारत भालके (पंढरपूर) हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या सर्व नेत्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या. त्यामुळे हे नेते उमेदवारीसाठीच्या मुलाखतीसाठी हजर राहिले नव्हते. अखेर या सर्वांना अपेक्षेप्रमाणे भाजपची वाट धरली आहे.


काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांसह मातब्बर नेत्यांचा समावेश


याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकरही उद्या भाजपचा झेंडा हातात धरतील. धनगर समाजाचा आक्रमक चेहरा आणि प्रभावशाली वक्तृत्व असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. २०१९ च्या सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोपीचंद पडळकर याना तीन लाखांहुन अधिक मते मिळाली होती. भाजपाच्या उमेदवारासमोर त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यांना भाजपतर्फे जत किंवा खानापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. 


शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप; पहिल्या यादीत 'या' शिलेदारांचा समावेश