मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबई भाजपातर्फे (BJP) 370 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं (DahiHandi Festival) आयोजन करण्यात आलं असून वरळी (Worli) विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून मेगा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर 1 हजार मंडळांच्या 50 हजार गोविंदांना 10 लाखाचं विमा कवच देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यानी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे.


मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचं आयोजन केलं जातं. भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सराव शिबिरात तब्बल 120 हून अधिक गोविंदा पथकं सहभागी झाली होती. 


प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. तसंच प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. यंदाची दहीहंडी महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची असणार आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.