मुंबई : धनगर आरक्षणाचा अहवाल पूर्णपणे प्रतिकूल नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसचं मराठा आरक्षणाचा प्रश्न कालमर्यादेत मार्गी लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात आले, तर त्यांचे स्वागतच असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जायकवाडीच्या धरणातून जेवढ्या पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यापेक्षा कमी पाणी औरंगाबादमधल्या दारूच्या कारखान्यांना लागतं असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


राज्य सरकारच्या कामगिरीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने झी २४ तासचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यात राज्यातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी रोखठोक उत्तरे दिली.