मुंबई : महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आला. देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, या सरकारचे बहुमत कधी होणार, याची उत्सुकता होती. ज्या प्रमाणे सरकारचा शपथविधी झाला, त्यावर शंका उपस्थित करण्यात आली. तुमच्याकडे बहुमत असताना तु्म्ही उशिर का, करत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडीनेही १६२ आमदार सोबत आहेत, असे म्हटले आहे. त्यानंतर सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात  गेला. न्यायालयाने उद्याच बहुमत घेण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्या, असे न्यायलयाने स्पष्ट करत उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. उद्या पाच वाजण्याची आधी आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावे असे न्यायालयाने सांगितले आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असून, उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर अधिक बोलण्यास नकार दिला.



महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. कुठलंही गुप्त पद्धतीन मतदान न घेता उद्याच फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. उद्या संध्याकाळी पाच वाजता फ्लोअर टेस्ट घेणं बंधनकारक असणार आहे. फ्लोअर टेस्टसाठी हंगामी आणि स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. विशेष म्हणजे गुप्त मतदानाला कोर्टानं नकार दिला असून खुल्या पद्धतीनं मतदान करावं आणि याचं लाईव्ह टेलिकास्ट कोर्टानं बंधनकारक केलंय. लोकशाही मूल्यांचं संरक्षण व्हावं,  लोकांना चांगलं सरकार मिळावं, यासाठी काही आदेश देणं गरजेचं आहे. तसंच घोडेबाजार रोखण्यासाठी कोर्टाला काही आदेश देणं गरजेचं आहे. त्यामुळंच खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन फ्लोअर टेस्टचे आदेश  सर्वोच्च न्यायालने दिलेत. त्यामुळे आता भाजपसमोर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.