Mumbai News : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात (Kokoan) जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी हा आतुर असतो. मात्र प्रवासाठी कमी प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता चाकरमान्यांना सुखरूपपणे कोकणात पोहोचवण्यासाठी राजकारण्यांकडून पाऊलं उचलली आहेत. भाजपाने (BJP) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर दिली आहे. भाजपा मुंबईतून (Mumbai) 6 ट्रेन आणि 250 बस सोडणार आहे. त्यामुळे आता कोकणी मते वळवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी खेळली जात असल्याचे म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा तीन दिवशी भाजपा मुंबईतून ट्रेन आणि बसेस सोडणार आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता मोफत करता येणार आहे. यासोबतच मुंबई भाजपच्यावतीने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी देखील सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुटणार आहे. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजपा मुंबईकडून उचलला जाणार आहे.


दरम्यान, यावर्षी मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांच्या 226 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी फक्त 2 रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि द्वितीय श्रेणी वातानूकूलित डबे आहेत. तर, काही रेल्वेगाड्या अनारक्षित आणि काही विनावातानुकूलित डबे आहेत.


मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू


मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक अखरे सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 10 सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन रस्ता सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पोलादपूर येथील भोगाव पासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी इथं बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. नऊ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. सिंगल लेन सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यना दिलासा मिळालाय.बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.


कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी


यंदा गणपतीला कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी करण्यात येणारेय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे आता 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणारेय. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून पास घ्यावे लागणार आहे.