मुंबई : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी गुजरात निवडणुकीत भाजापच जिंकेल आणि काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावा केलाय. एनसीपीचा हल्लाबोल म्हणजे फक्त विरोध आहे, असे ते म्हणालेत. 


राष्ट्रवादीवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारला खोटे ठरवण्याचे काम सत्ता दूर गेल्याने करत असल्याची टीका आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. राहुल गांधी अध्यक्ष झाल्याचा फायदा भाजपाला होईल असा खोचक टोमणा ही आठवले यांनी लगवला.


'गुजरातमध्ये भाजपचा पराभव अटळ'


गुजरातच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज पुण्यातील भाजपचे खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे. देशातील सर्व मतदानोत्तर चाचण्या भाजपच्या पारड्यात सत्ता टाकत असताना संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. त्यांनी स्वत: करून घेतलेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष असल्याचा त्यांचा दावा आहे. 


अशा परिस्थितीतही तिथे भाजप विजय झाल्यास तो फक्त मोदींचा करिश्मा असणार आहे, असं त्यांचे म्हणणं आहे. काकडे यांनी पुणे महापालिकेत भाजपला ९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावेळी तो खरा ठरला होता. खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरूण मेहेत्रे यांनी.


काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला सुरुवात


दरम्यान, काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला सुरुवात झाली आहे.  राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.


राहुल गांधी हे काँग्रेसचे 16वे अध्यक्ष झालेत. या कार्यक्रमादरम्यान मनमोहन सिंग यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. तर सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत भाजप सरकारवर हल्लाबोल केला.