मुंबई : किरीट सोमय्या यांच्यावर हल्लानंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. आशिष शेलार देखील या ठिकाणी पोहोचले असून शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पोलिसांचा सहकार्याने खार पोलीस स्टेशनचा आवारात 100 शिवसैनिकांनी माझावर हल्ला केला, जीव घेण्याचा प्रयत्न केला. गाडीची काच फोडली. देव कृपेने वाचलो. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


खार पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. सोमय्या यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. गाडीची काच देखील फूटली. किरीट सोमय्या हे वांद्रे पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत.


भाजपने आता रविवारी सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात राज्यात आंदोलनचा इशारा दिला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


'भाजप आजही तयार आहे, लोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ पण ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ.' असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.