मुंबई : बार उघडलेत, मग मंदिरं बंद का? असा सवाल करत भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. सोशलडिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मंदिर सुरू व्हावीत यासाठी भाजपने मुंबईसह विविध ठिकाणी आंदोलने केली. मुंबईत सिद्धिविनायक मंदिराबाहेर साखळी उपोषण केले. यानिमिताने राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.



दरम्यान, मंदिरं सुरू करण्याच्या वादात आता राज्यपालांनी उडी घेतलीय. राज्यात बार सुरू झाले मग मंदिरं बंद का असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं त्यात हा सवाल विचारला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमचे प्रमाणपत्र नको. जीप जपण्याला प्राधान्य देणार आहे. मंदिरे उघडणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मुख्यमंत्र्यांनी राजपाल कोश्यारी यांना पत्र लिहून स्पष्ट केले आहे.



भाजपच्यावतीने संपूर्ण राज्यात आज आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहर भाजपच्यावतीने झोपी गेलेल्या या कुंभकर्णरुपी सरकारला जागे करणारे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आळं. कुंभाकर्णाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आलं. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक याठिकाणी करण्यात आले. कोल्हापुरातही भाजपने सरकारविरोधात आंदोलन केले. नागपुरात वर्धा मार्गावरच्या साई मंदिराबाहेर भाजपने भजन आंदोलन केलं. या आंदोलनात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि भाजपचे स्थानिक नेते सहभागी झाले.