मुंबई : bjp launches pol khol campaign : भाजपचा पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections 2022) तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी रथ मुंबईत फिरविण्यात येत आहे. दरम्यान, चेंबूरमध्ये या  पोलखोल अभियान गाडीची रात्री तोडफोड करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून चेंबूरमधून पोलखोल अभियान उदघाटन होत होते. त्याआधीच गाडीवर अज्ञात लोकांनी दगड मारत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्ही अशाने घाबरणारे नाहीत. त्यांची पोलखोल करणार,असा इशारा यावेळी भाजपकडून देण्यात आला आहे.


 भाजपाची पोलखोल अभियान प्रचार रथ गाडी फोडली आहे. चेंबूर येथे रात्री अचनाक गाडी फोडली. आजपासून चेंबूर येथे पोलखोल अभियान उद्घाटन होत होते, त्या आधीच गाडीवर अज्ञात लोकांनी दगड मारत तोडफोड केली. या कार्यक्रमाचे आयोजक राजेश शिरवाडकर यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या गैर व्यवहाराबाबत भाजपकडून पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात आज होत आहे. चेंबूर येथील भाजप कार्यालयापासून रथयात्रा निघेल, असे ते म्हणालेत.


यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही शिवसेनेला आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. आमच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड विरोधकांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचा पालिकेतील कारभार सगळ्यांनाच माहित आहे. आम्ही या कारभाराची पोलकोल करणार आहोत. त्यामुळे असे हल्ले होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सराकरच जबाबदार राहिल. आम्ही लोकशाही पद्धतीने हा विरोध करत आहोत. आंदोलन करत आहोत. तो आमचा अधिकार आहे. मात्र, अशा घटना जर घडल्या तर राज्य सरकारची जबाबदारी राहिल, असे दरेकर म्हणाले.