उरण : उरणमध्ये शनिवारी आणि रविवारी काळा पाऊस पडला. पावसाचं हे पाणी प्रदूषित असल्याचं उरणवासियांचं म्हणणं आहे. या आधी कधीही असा पाऊस या ठिकाणी पडला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिकांनी  दिलेल्या माहितीनुसार, पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर काही काळ हा काळा पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाचं चांगले पाणी पडण्यास सुरुवात झाली. उरणजवळ असलेल्या बुचर आयलंडमधील तेलाच्या टाकीला लागलेल्या भीषण आगींनतर पडलेला हा पाऊस काळा पडला. यामुळे आगीमुळे दूषित झालेले धूलिकण पावसाबरोबर खाली आले. यामुळे हा पाऊस काळा पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. या पाण्याची तपासणी करण्याची मागणी आता उरणवासीयांनी केली आहे.


दरम्यान, शहरांतील नागरिकरण, झपाट्यान वाढत असलेल्या औद्योगीक वसाहती, वाहनांची गर्दी या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील अनेक कारखान्यांचे सांडपाणी नदी, नाले, समुद्रात सोडले जात आहे. तर, याच कारखान्यांमधून बाहेर फेकला जाणारा धूर हा आकाशात मिसळला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारखाण्यांच्या चिमन्या हव्या त्या प्रमाणात उंचींवर नसतात. त्यामुळे कारखान्यांचा धुर जमिनीलगतच्या पर्यावरणात पसरतो. परिणामी नागरिकांना त्याचा त्रास होतो.


उरणमध्ये पडलेला काळा पाऊसही वाढते नागरिकरण आणि औद्योगीक वसाहतींमधून बाहेर पडणारा धुर यांचाच परिणाम असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.