मुंबई : स्वदेशीचा नारा देणाऱ्या रामदेव बाबांच्या प्लांटला सुद्धा देशी गाईचं दूध जात नाही. सगळ्यात बदनाम अशा डेअरीच त्यांच्या प्लांटला दूध जातंय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या टाकळीमिया येथील सभेत बोलतांना केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीची सभा अहमदनगर जिल्हयातील टाकळीमिया येथे पार पडले या सभेत सरकाने भिक मागावी मात्र आमचे पैसे द्यावेत अशी मागणी केली आहे. शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीकाही केली आहे.


केद्रातील कृषी मंत्री आता आम्हाला शेंद्रीय शेती आणि गावराण गाई पाळण्याच सल्ला देतात मात्र त्यातून उत्पादन कमी होतंय. दुसरीकडे स्वदेशीचा नारा देणाऱ्या रामदेव बाबांच्या प्लांटलाही राज्यातील सर्वाधिक बदनाम डेरीच दूध जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.