मुंबई : मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ व्यावसायिक इमारतींवरच्या छतावरच हॉटेल्स सुरू करता येणार आहेत. मात्र, यासाठी आजूबाजूला १० मीटर अंतरावर रहिवासी इमारत नसणं बंधनकारक असणार आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागातल्या छतावरील हॉटेल्सना परवानगी देण्यात आलीय. 


युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळं शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय.