COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्यभरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असली तरी मुंबईत मात्र आजचा पहिला दिवस हा प्रत्यक्ष कारवाईऐवजी दुकानदारांची जागृती करण्यासाठीच बीएमसीनं खर्ची घातला. सकाळी पालिका मुख्यालयात प्लास्टिक वापरणा-यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या २५० निरिक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सीएसटी परिसर, कॉफ्रर्ड मार्केट इथं जनजागृती रँली काढण्यात आली. यावेळी दुकानदारांना प्लास्टिक न ठेवण्याबाबत केवळ सूचना करण्यात आल्या. वरिष्ठांच्या आदेशानंतरच दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार असून सोमवारीपासून ही दंडात्मक कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. केवळ दुकानादारांवर ही कारवाई होणार असून सामान्य नागरिकांवर प्रत्यक्ष कारवाई होणार नसल्याचे बीएमसीनं स्पष्ट केलं आहे.


आजपासून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभर प्लास्टिक बंदी लागू केलीये. प्लास्टिक बंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केलीये. त्यानुसार पहलित्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यसाठी सर्वांनी जवळ असलेलं प्लास्टीक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.


प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं मुंबईतील विविध भागात ३७ संकलन केंद्र सुरु केलेत. ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रातही प्लास्टिक गोळा केलं जात आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत पालिकेच्या  संकलन केंद्रात १४५ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा झालंय. प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यासाठी पालिकेनं २५० अधिकारी नेमले असून त्यांना दंडात्मक कारवाईचे आधिकार देण्यात आलेत. प्लास्टिक बंदिसाठी राज्यात पालिका क्षेत्रात आयुक्त तर ग्रामपंयाचत क्षेत्रात ग्रामसेवकांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.