Mumbai Forest: मुंबईतील काही परिसर आता पुन्हा एकदा हिरवाईने नटणार आहेत. पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यासाठी मुंबई महापालिकेने एक भन्नाट उपक्रम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेतली आहे. कुर्ला, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडेतीन हजार वृक्षांची पारंपारिक पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अशी माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील पुरातन वृक्षांच्या संगोपनासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. कुर्ला, पवई आणि बोरिवलीत सुमारे चार एकरवर साडेतीन हजार वृक्षांची पारंपारिक पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईच्या हिरवाईत आणखी वाढ होणार आहे. कुर्ला, पवई आणि बोरिवलीत हरित पट्टा बहरणार आहे. 


कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन टिकाणी वृक्ष लागवडीसाठी आरक्षित असलेल्या तब्बल चार एकर भुखंडावर साडीतीन हजार वृक्ष लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर, झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी, याचा आराखडादेखील तयार करण्यात येणार आहे. झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, झाडांची पडझड कशी रोखावी या विषयांवर चर्चा करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थाचे पदाधिकारी व पर्यावरणतज्ज्ञांची बैठक देखील पार पडली होती. 


दरम्यान, महानगरपालिका क्षेत्रात आणखी 29 ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसंच, पुरातन वृक्षांचे संगोपन करण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहे. धोकादायक ठरणाऱ्या झाडाच्या फांद्याची योग्य पद्धतीने छाटणीही वेळोवेळी करण्यात येते. यासह अधिकाधक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी करण्यात येईल, यासाठीही महानगरपालिका प्रयत्न करणार आहे. 


एक डॉक्टर एक झाड 


एक डॉक्टर एक झाड उपक्रम राबवावा. महापालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारामाही सोय करावी. उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्ष लागवडीसाठी करावा, नागरी नवे (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणात सहभाग वाढवावा, असा विविध पर्यायांचा उपयोग करावा.