मुंबई पालिका डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेला विरोध
मुंबई महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्यास स्थायी समितीनं विरोध केलाय.
मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्यास स्थायी समितीनं विरोध केलाय. डॉक्टरांच्या सेवनिवृत्तीचे वय सुरुवातीला ५८ होते, नंतर ते ६२ करण्यात आले आणि आता ते ६४ करण्याचा घाट पालिका प्रशासनानं घातलाय.
तसं परिपत्रकही काढून ते पालिका रुग्णालयांना पाठवलंय. पण हे परिपत्रक रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय करणारे असल्याचं सांगत याला स्थायी समितीनं विरोध केलाय.
लोकप्रतिनिधींना विश्वासान न घेता प्रशासनानं हे परिपत्रक काढल्यानं त्याचे पडसाद स्थायी समितीत उमटले. या निर्णयाला डॉक्टरांच्या संघटनांनीही देखील विरोध केला आहे.