Ex Corporator Rajul Patel: शिवसेनत 2 गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ही रिघ थांबायच नाव घेत नाहीय. शिवसेना फुटीच्या नंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर याचा परिणाम दिसून आला. आता आगामी पालिकेच्या निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील नागरिकांसह सर्वच राजकीय पक्ष आता मुंबई पालिकेच्या निवडणुकीची वाट पाहतायत. मुंबई पालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे सर्वांनीच यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक  आणि माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केले आहे.


राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती मात्र त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली होती.राजुल पटेल या माजी नगरसेविका म्हणून ठाकरे शिवसेनेत कार्यरत होत्या. त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकीत लढवली होती. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे.