Mumbai Potholes work News in Marathi : पावसाळापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येते. यंदाही रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात. खड्ड्यावरुन महानगरपालिकेवर नेहमी टिका केली जाते. खड्डे बुजवल्यानंतर त्याच ठिकाणी वारंवार खड्डे पडत असल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे यंदा मुंबई महानगपालिकेच्या रस्ते विभागाने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही मुंबईतील रस्ते  खड्डेमुक्त झालेले नाहीत. यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडणार असल्याची शक्यता वर्तवीत पालिका प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी 107 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा सामना करावा लागतो. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते विभागाने 16 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे आणि जीर्ण पॅच हटविण्याचे अनेक आदेश दिले आहेत.


काँक्रिटीकरणाची कामे अजून सर्वच ठिकाणी सुरू झालेली नाहीत. शहर भागातील कामे तर वर्षभरापासून रखडली आहेत. तर जुने कंत्राट रद्द करुन 1300 कोटींचे नवे टेंडर काढण्यात आले आहेत. मात्र काँक्रिटीकरणाची कामे पावसाळापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचाही पावसाळा खड्ड्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेला खड्डे बुजविण्यासाठी 100 कोटी खर्ची घालावे लागणार आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मास्टिक डांबरच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. 


एप्रिलमध्ये काँक्रिटीकरण्याच्या कामाला सुरुवात 


9 मीटरपेक्षा कमी आणि जास्त रुंदी असलेल्या शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहेत. एप्रिलमध्ये खड्डे भकणी सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही. 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतिपथावर आहेत. 


खड्डे बुजवण्यासाठी तरतुद


पश्चिन उपनगर - 43.5 कोटी
शहर - 33.5 कोटी
पूर्व उपनगर - 30 कोटी