मुंबई : मुंबईच्या कुलाबा परिसरातील ताज हॉटेलवर मुंबई महापालिका मेहरबान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. ताज हॉटेलने मनपाचा रस्ता बळकावला असून याप्रकरणी ९ कोटींची आकारण्यात आली. पण ही रक्कम मनपा अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमत करून ६२ लाखांवर आणल्याचा असा खळबळजनक आरोप रवी राजा यांनी केला आहे.  मुंबईत २६/११ च्या दहशतावादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल व्यवस्थापनाने समोरील पालिकेचा रस्ता ताब्यात घेतला. त्यानंतर इथे खासगी वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली होती. मात्र याच रस्त्याचा वापर ताज हॉटेल खासगी पार्किंगसाठी करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


१० वर्ष रस्ता वापरल्यामुळे ९ कोटी ८५ लाखांची आकारणी मनपाकडून करण्यात येणार होती. मात्र मनपा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ही आकारणी ९ कोटींहून ६२ लाखांवर आल्याचा आरोप रवि राजा यांनी केला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी स्थायी समिती आणि सभागृहाला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा एकही रुपया न सोडणारी पालिका ताज हॉटेलवर येवढी मेहेरबान का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.