मुंबईकरांनो सावधान! `या` 5 दिवसात हाय टाईडचा अलर्ट, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा
BMC Alert Of High Tide: खास करून पावसाळ्यामध्ये भरतीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असते. या काळात लाटांची उंची जास्त असले त्यामुळे मुंबई महापालिकेने चौपाटीवरील पर्यटकांना काळजी घेण्याचं आव्हान केलंय.
High Tide Alert In Mumbai: मुंबईमध्ये पावसाळ्याच्या (Moonson Update) काळात समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती (High Tide) येत असते. जून ते सप्टेंबरच्या काळात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर उंचच्या उंच लाटा दिसून येतात. अशातच आता बुधवार म्हणजेच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना (Mumbai News) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भरतीच्या वेळी 4.66 ते 4.88 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौपाटीवर जाताना सावधगिरी बाळगावी, असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वर्सोवा, मार्वे, मढ आणि अन्य समुद्रकिनारी तैनात असलेल्या जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 2 आणि 3 सप्टेंबरला शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदा जूनमध्ये पाच दिवस, जुलैमध्ये सहा तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक आठ दिवस मोठी भरती होती.
खास करून पावसाळ्यामध्ये भरतीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असते. या काळात लाटांची उंची जास्त असले त्यामुळे मुंबई महापालिकेने चौपाटीवरील पर्यटकांना काळजी घेण्याचं आव्हान केलंय. जून महिन्यात पाच समुद्राला दिवस भरती आली होती. तर ऑगस्ट महिन्यात याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. तर आता येत्या महिन्यात देखील हाई टाईडचा इशारा देण्यात आला आहे. त्यावेळी देखील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील.
दरम्यान, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा-या तलावांत जवळपास 90 टक्के पाणीसाठा जमा झालाय. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव भरलेत. अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा तलाव भरणं बाकी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस परतल्यानं पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहोचलाय.