मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, `येथे` पाठवा अर्ज
BMC Job:
BMC Job: तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग आता तुम्हाला इतरत्र संधी शोधण्याची गरज नाही. मुंबई पालिकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई पालिकेत ज्युनिअर ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर पदाच्या 38 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी / कोणतीही इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार SAP HCM प्रमाणपत्र धारक असावा. एवढेच नव्हे तर उमेदवारांना हे शिक्षण घेताना 45 टक्के गुण असणे आवश्यक आहेत. एमएचसीआयटी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.
वयोमर्यादा
ज्युनिअर ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपयांची सवलत देण्यात येईल. त्यांच्याकडून 900 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज
कुठे पाठवाल अर्ज?
पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
शेवटची तारीख
15 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन माध्यमातून पाठवायचे आहेत. ऑफलाईन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. अर्ज भरण्याआधी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असेल किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.