मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो रूपयांची खरेदी केलेली औषधे गरजू रूग्णांना न देता तशीच डिस्पेन्सरीमध्ये साठा करून ठेवलाय. धक्कादायक म्हणजे, या औषधांची मुदत संपल्याने आता त्याचा वापरही करता येणार नाही. ही औषधे फेकून देण्याचा एकच पर्याय आता पालिकेसमोर आहे. 


बांद्रा ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरीमार्फत ही औषधे वाटण्यासाठी आणण्यात आली होती. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून हा औषधांचा साठा अंधेरी पूर्व इथल्या के पूर्व वॉर्ड ऑफिसच्या तळमजल्यावरील डिस्पेन्सरीमध्ये पडून आहे. 


अॅसिडिटीवरील एन्टासाईडच्या बॉटल्स भरलेली 50 हून अधिक बॉक्स याठिकाणी पडून आहेत. याची किंमत सहा लाखांहून अधिक आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाला याची पर्वा नाही.