मुंबईतील अग्निकांडानंतर रविवारीही मनपा अधिकारी कामावर
कमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्निकांडानंतर प्रशासनाला जाग आली आहे. रविवार असूनही महापालिकेनं या परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच ठेवलीये.
मुंबई : कमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्निकांडानंतर प्रशासनाला जाग आली आहे. रविवार असूनही महापालिकेनं या परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच ठेवलीये.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
कमला मिलमध्ये झालेल्या अग्निकांडाला दोन दिवस उलटून गेल्यानंतर आता कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच आहे.
अग्निकांडात जळलेले अवशेष आणि पाडकामामुळे सगळीकडे पडलेला उद्धवस्त बांधकामांचा खच असं चित्र बघायला मिळतंय.
मुंबई | अग्निकांडानंतर रविवारीही मनपा अधिकारी कामावर