कोरोनाला लगाम घालण्यासाठी BMC चा मास्टरप्लॅन; लोकलमधली गर्दीही होणार कमी
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने BMC प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने BMC प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर BMC मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मुंबईती कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी महापालिकेने खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादले आहेत. खासगी कार्यालयांमधील गर्दी 50 टक्के इतकी झाल्यास लोकल ट्रेनमधीलही गर्दी कमी होण्यास मदत होईल.
मुंबईतील खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. आता महापालिका या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कठोर पाऊले उचलणार आहे.
त्या करीता प्रत्येक विभागात मनपाची पाच पथकं तैनात करण्यात आली आहेत. ही पथकं खासगी कार्यालयावर नजर ठेवणार आहेत.