मुंबई : नाईट लाईफच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. अनिवासी भागातील योग्य त्या ठिकाणांचा शोध घेवून त्याची यादी बनवण्याचं काम वेगाने सुरु आहे. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेवून मुंबई पोलिसांबरोबरच महापालिकाही काळजी घेतं आहे. २४ तास सुरू ठेवल्या जाणाऱ्या दुकाने, मॉल, रेस्टॉरंटची पाहणी करुन त्यांची यादी तयार केली जात आहे. मरिन ड्राईव्ह, फोर्ट, बीकेसी तसंच मिलमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात नाईट लाईफ सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनमंत्री होताच आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या नाईट लाईफबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. २६ जानेवारीपासून मुंबईच्या नाईट लाईफला सुरूवात होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र थोडा यावर थोडा ब्रेक लावला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'नाईट लाईफ' बाबतचा निर्णय २६ जानेवारीपर्यंत घेता येणार नाही.' पोलीस यंत्रणेवर किती ताण पडू शकतो याची पूर्ण माहिती घेऊनच राज्य शासन निर्णय घेईल. तसेच यंत्रणा पुरेशी आहे की नाही हे बघून निर्णय घेतला जाणार आहे.'


आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाचं आमदार रोहित पवार यांनी देखील कौतुक केलं होतं. नाईट लाईफमध्ये मुंबईतली रेस्टॉरंटस, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना रात्रभर शॉपिंग करता येणार आहे. सिनेमा पाहता येणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटन मंत्री होताच त्यांनी हा पहिला निर्णय घेतला.