BMC Scam: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एका घोटाळ्याचे शस्त्र उगारले आहे. मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घोटाळ्याचा त्यांनी सुजित पाटकरांशी संबंध असल्याचे सांगितले. संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेवर त्यांनी आरोप केले आहेत. कोविड काळात ब्लॅक लिस्ट कंपनीला वरळी बीएमसी कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. संजय राऊत यांचा पार्टनर सुजित पाटकर ला या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार, असे सोमय्या यावेळी म्हणाले. 


कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित लोकांना कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा पुणे पोलीस आयकर विभाग लाईफ लाईन हॉस्पिटलच्या घोटाळ्याची चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.