मुंबई : मुंबई महापालिकेच्या रस्ते गैरव्यवहारातला मुख्य आरोपी असलेला तत्कालीन मुख्य रस्ते अभियंता अशोक पवारवर पालिका मेहेरबान झालीय. निलंबित पवारचे निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातला प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते गैरव्यवहाराच्या चौकशीत अशोक पवार याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. विभागाचे प्रमुख म्हणून पवार रस्ते गैरव्यवहार रोखण्यात अपयशी ठरल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळंच त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसंच अनेक महिने पवार जेलमध्येही होता.


या प्रकरणी १८० अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. सर्वांवर वेतन कपाती संदर्भातली कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी असलेल्या पवारच्या निवृत्ती वेतनाचा घाट प्रशासनानं घातलाय. 


त्यामुळं कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय देण्यात येत असल्याचं समोर येतंय.