गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्टेशन म्हणून बोरिवली स्थानकाची ओळख निर्माण झाली आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्वात गर्दीचं बोरिवली हे स्थानक ठरलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे. याठिकानाहून दररोज 3 लाख प्रवाशी प्रवास करतात. बोरिवली स्थानकात विरार, डहाणू, भाईंदर तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत गेली. याचा मोठा भर रेल्वेवर पडला. परंतु त्या तुलनेत रेल्वे फेऱ्या मध्ये हवी तशी वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे या मुख्य रेल्वे स्थानकावर अतिरिक्त भार
पडला आहे. जवळपास 10 प्लेटफॉर्म संख्या असलेल्या बोरीवली स्थानकात विरार वरुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलद गाड्या येथे थांबतात. मात्र बोरीवलीकरांना गाडीत चढण्यास व उतरण्यास मिळत नाही.


रेल्वे प्रशासनाला सर्वात अधिक उत्पन्न मिळवून देणारे बोरिवली स्थानक असलं तरी देखील याठिकाणी पाहिजे तशा सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.


कोणत्या स्थानकावर सरासरी किती प्रवाशी


विरार : 2 लाख पेक्षा जास्त


बोरिवली : 3 लाख पेक्षा जास्त


अंधेरी : 2.50 लाख पेक्षा जास्त


बांद्रा : 1.50 लाखा पेक्षा जास्त


महालक्ष्मी : 41 लाख पेक्षा जास्त


सांताक्रूझ : 1 लाख पेक्षा जास्त


जरी आता बोरिवली स्थानकावरील प्रवाशांची लक्षणीय वाढ झाली असेल तरी देखील प्रवाशांना सुविधा अधिक उपलब्ध रेल्वे प्रशासन करेल का हेच पाहवे लागणार आहे.