भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे. भिवंडी कल्याण रोडवरील भादवाड इथल्या अरिहंत टॉवरमध्ये राहणारा धीरज जामकर आपल्या मित्राच्या बाईकवरुन दहावीच्या क्लासला जात होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईकवरुन जात असताना खड्डे चुकवण्याच्या नादात धीरज बाईकवरुन खाली पडला आणि त्यावेळी मागून येणा-या ट्रकनं चिरडल्यानं त्यात त्याचा करुण अंत झालाय.


भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालीय. आतापर्यंत या खड्डयांमुळे किमान दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला असून कित्येक जण अपघात होऊन जायबंदी झालेत. त्यामुळे नागरिकांची मागणी किमान रस्त्यांमधील खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी वाढत आहे.


महापालिका प्रशासन आणि महापौर यांना लेखी पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आमदार रुपेश म्हात्रे यांनी केलीय. मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिलाय.