Mumbai News : मुंबईत पुन्हा एकदा आगाची घटना समोर आली असून आज (15 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे. आगीने भीषण रौद्ररुपधारण केले असून 6 मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागामध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक इमारतीला आग लागली आहे. भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीची चौथ्या मजल्यावर आग लागली होती. आगीने रौद्ररुप धारण केलं. इमारतीच्या 10 व्या मजल्यापर्यंत आगीचे लोन पसरले आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.


वाचा: मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक; 'या' लोकल ट्रेन बंद 


दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील मालाड परिसरात एका झोपडपट्टीमध्ये भीषण आगीची घटना घडली होती. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक 15  लेंडरचा स्फोट झाला. या आगीमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर आगीत 10 ते 15 झोपडीधारक जखमी झाले. या आगीमध्ये 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.