मुंबई : दिवाळी म्हटलं की खरेदी आली, त्यातही नवं घर घेण्याची उत्सुकता ग्राहकांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. यंदाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या नामांकित बिल्डरांनी दिवाळीनिमित्त ऑफर्स ठेवल्या आहेत. यात सोन्याच्या नाण्यांपासून दुचाकी, एवढंच नव्हे तर चारचाकी कार देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.


मोठ मोठ्या ऑफर्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभरात बांधकाम क्षेत्रांत अनेक मोठे मोठे निर्णय झाले. यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्याने परिणामी बांधकाम क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम झाला अशी ओरड बिल्डर वर्गाकडून करण्यात आली. त्यातही नोटबंदीनंतर मुंबईतील अनेक घरांमध्ये गुंतवणूक थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले.


ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी बिल्डरांकडूनही यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ मोठ्या ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.


घरांच्या खरेदीवर ऑफर 


'दिवाळीत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स ठेवण्यात आले आहेत. यात यंदा मालाड आणि भिवंडी प्रोजेक्टसाठी मोफत स्टँप ड्युटी-रजिस्ट्रेशन, मॉडिलोर किचन, फ्रीज, फर्निचर, सोन्यांची नाणी, दुचाकी तसेच चारचाकी वाहन ग्राहकांसाठी घरांच्या खरेदीवर ठेवण्यात आल्याचे' संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीचे सीएमडी रमेश संघवी यांनी सांगितलं.


'दिवाळीत सर्वसामान्यांना कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच घरात पूर्णपणे फर्निचर देण्याचा आमचा मानस असल्याचे' निर्वाणा रिअँल्टीचे सीईओ पुनीत अग्रवाल यांनी सांगतात.