अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी आंदोलनाची हाक, 1 जूनला `ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो` आंदोलन
देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
मुंबई : महागाई, भ्रष्ठाचार आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची राळ उठविणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( anna hazare ) यांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सतत गॅस दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह, अन्न-धान्यही महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
महागाई विरोधात सर्वसामान्यांचा मोठा आक्रोश आणि संताप सुरू आहे. जनता महागाईमुळे त्रस्त असताना, होरपळत असताना अण्णा हजारे शांत आणि निवांत कसे आहेत, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद ( somnath kashid ) यांनी केला आहे.
अण्णा हजारे झोपले असतील तर त्यांना जनतेसाठी उठवण्याची आणि महागाई विरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथील निवासस्थानासमोर 1 जून रोजी 'ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो' आंदोलन करणार आहे अशी माहिती सोमनाथ काशिद यांनी दिली.