मुंबई : मोदी सरकारनं जाहीर केलेल्या हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्यानं नोंदवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अनुदान आणि राष्ट्रधर्म' असं शीर्षक दिलेलं एक व्यंगचित्र राज ठाकरेंनी 'फेसबुक'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलंय. 


अनुदान काढून घेतानाच बांग्लादेशी आणि पाक घुसखोरांना देशातून हाकलून देण्याचा सूचक इशारा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी आपल्या या व्यंगचित्रातून दिलाय.



मुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान केंद्र सरकारनं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. सर्वोच्च न्यायालयानं २०१२ साली दिलेल्या निर्देशानुसार सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलंय.


यावर एमआयएमचे खासदार यांनी भाजप सरकारला काशी, अयोध्या, मानसरोवर अशा हिंदू यात्रांसाठी दिलं जाणारं अनुदान बंद करण्याचं आव्हान दिलंय.