मुंबई : Sameer Wankhede Caste Certificate : अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून ( Scheduled Castes National Commission ) समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते' असं अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं मंत्री नवाब मलिकांना मात्र मोठा झटका बसला आहे. (Caste Certificate: Consolation to Sameer Wankhede, big blow to Minister Nawab Malik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर वानखेडे यांना टार्गेट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील आयोगाने दिल्या आहेत. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे यांना त्रास न देण्याचे पोलिसांना निर्देश दिलेत.


अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या अटकेनंतर एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद पाहायला मिळाला.  



या कलगीतुऱ्याच्या केंद्रस्थानी समीर वानखेडे यांची जात होती. मात्र आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांना मोठा दिलासा दिला आहे तर नवाब मलिकांना मोठा झटका बसलाय.


नवा मलिक यांनी जात प्रमाणपत्र खोटे असून फर्जिवाडा करत नोकरी मिळविल्याचा आरोप केला होता. दोन जन्मदाखले असल्याचे पुढे आले होते. एकावर नाव वेगळे आणि दुसऱ्यावर नाव वेगळे, असा दावा करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे मलिक यांना मोठा दणका बसला आहे.