मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता CBI अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या केसच्या आधारे EDकडून PMLA केस केली. त्यानंतर आता सीबीआय अर्ज करून कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीच्या विशेष कोर्टान हा फैसला सुनावला आहे. सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी बार मालकांची यादी दिली होती, त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात होती असा दावा ईडीनं सुनावणीत केला. त्यामुळे या प्रकरणात वाझेचा मोठा सहभाग असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर ईडीने 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. तर शनिवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


ऋषिकेश देशमुखांना ईडीचं समन्स
अनिल देशमुखनंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. दरम्यान ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.