मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर आता पुढील तपासासाठी सीबीआयची टीम आज मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सीबीआय घटनास्थळापासून, सुशांतच्या जवळच्या सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसंच मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं, असंच न्यायालयाकडून सागंण्यात आलं आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआय करणार असल्याचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करून खोचक टिप्पणी केली आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे देण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाप्रमाणे  होऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.