पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये वर्षभरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल
मुंबई : येत्या वर्षभरात पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय लोकलगाड्यांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्या 50 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. वर्षभराच्या कालावधीत 220 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. 15 डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी 5 डबे असतात तर 12 डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी 3 डबे आहेत. महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण महिला डबे मात्र तितकेच आहेत. अशावेळी महिलांना प्रचंड गर्दीतूनच प्रवास करावा लागतो.
याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...