नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुपरमूनचं होणार दर्शन
आज नूतन वर्षारंभी सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल.
मुंबई : आज नूतन वर्षारंभी सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर असतो. पौर्णिमेला जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला सुपरमून म्हणतात.
अशावेळी चंद्रबिंब नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चौदा टक्के मोठं व तीस टक्के प्रकाशित दिसतं.