COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : तबलिकी मरकज प्रकरणानंतर देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.यावरुन तबलिकींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.  त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी मुस्लिम धर्मगुरुंसोबत चर्चा करु त्यांच्यामाध्यमातून मुस्लिम समाजात शांती, सामंजस्याचा संदेश पोहोचवला. दरम्यान मुस्लिम धर्मगुरुंनी देखील आगामी शब्बे बारात बद्दल समाजाला आवाहन केले आहे. ९ तारखेला असणाऱ्या शब्बे बारात दिवशी मुस्लिम बांधवांनी घरातून बाहेर पडून शब्बे बारात साजरी करू नये शब्बे बारात घरातच साजरी करा असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे. 


शब्बे बारात च्या दिवशी मुस्लिम लोक क़बरस्तान ला जातात आणि आपल्या पूर्वज्यांचा कबरी वर फातिहा देतात त्यामुळे घरातून बाहेर न पडता घरातच राहून नमाज अदा करा खासकरून तरुणांनी बाहेर पडून कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही याची खबरदारी घ्यावी पोलिसांना सहकार्य करावे असे ही आवाहन मुस्लिम धर्मगुरूंच्या वतीने मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे.


शब्बे बारातच्या दिवशी पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी प्रार्थना करा. कोरोनामुक्त भारत होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरु मौलाना मोईन मिया आणि हिंदुस्तानी मस्जिदचे इमाम मौलाना अब्दुल जब्बार यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.



मुंबईत रुग्ण वाढले 


आज मुंबईत कोरोनाचे १०६ नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ६९६ वर गेली आहे. यातील पाच जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४५ झाली आहे. तसेच ५९ रुग्ण बरे झाले आहेत.