मुंबई : चित्रपट क्षेत्रातील असो, क्रीडा क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील दिग्गज असो. हे तारे आपल्याला सहसा उपलब्ध होत नाही किंवा सर्वसामान्यात मिसळलेली दिसत नाहीत. मात्र मतदानासाठी मतदान केंद्रावर या तारे-तारकांनी सामान्यांसोबत रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. चौथ्या टप्प्यात मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये मतदान पार पडलं. त्यामुळं मतदानासाठी मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवू़डची सगळी तारकादळे मतदानासाठी घराबाहेर पडल्याचं चित्र होतं. बॉलिवू़डकरांपैकी एक असलेली उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात आहे. तिनं मतदान तर केलंच शिवाय मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी गाणंही गायलं.


बॉलिवूडचे शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन सहकुटुंब मतदानासाठी आले होते. भाईजान सलमान खान मात्र मतदानाला एकटाच आला होता. ऋतिक रोशन वडील राकेश रोशन यांच्यासोबत मतदान केलं. अजय देवगण आणि काजोल जोड्यानं मतदानासाठी आले होते. प्रियंकानंही मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त हिचा भाऊ संजय दत्तनंही मान्यता दत्तसह मतदान केलं. या वेळी संजय दत्तनं त्याच्या खास स्टाईलमध्ये मतदान केल्याची खूण दाखवली. 


मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव हिनंही मतदान केलं. अभिनेता स्वप्निल जोशी हा ही सकाळी सकाळी मतदानाला आला होता. मतदानासाठी सव्वा तास रांगेत उभं राहिल्याचं त्यानं सांगितलं.


बॉलिवूडच्या या तारकादळांनी मतदानाचा अधिकार तर बजावलाच. शिवाय इतर लोकांनाही मतदानाचं आवाहन केलं. मतदान करण्यासाठी सेलिब्रिटीही सर्वसामान्यांसारखे रांगेत उभं राहिल्यानं आज सामान्य मतदारांनाही व्हीआयपी झाल्याचं समाधान मिळाल्याचं दिसलं.