मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महानगरपालिकेचे तब्बल 439 कोटी 44 लाख रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याच्या बिलाचे हे 439 कोटी 44 लाख रुपये थकवण्यात आलेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आलीय. 2001 ते 2018 या गेल्या अठरा वर्षांतील पाण्याच्या बिलासाठीचे 439 कोटी 44 लाख रुपये रेल्वेनं महापालिकेला दिलेच नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे कॉलनी, कारशेड, रेल्वे वर्कशॉप, रेल्वे कार्यालयातली पाण्याची बिलं थकली आहेत. ही थकबाकी केवळ मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित नाही.


नवी मुंबई,ठाणे,कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या महापालिकांमध्येही रेल्वेची ही पाण्याची बिले थकीत असण्याची शक्यता आहे.


थकीत रकमेवर 45 दिवसा नंतर 2% दंड दर महिन्याला आकारला जातो. या दंडाची रक्कम आता सामान्य प्रवाशांच्या खिशातून जाणार आहे. रेल्वे आणि महापालिकेच्या गलथानपणाचा भुर्दंड निष्कारण मुंबईकरांना बसतोय.